नगर-पुणे महामार्गावर ट्रकने दोघांना चिरडले वाघुंडे येथील अपघातात दोन ठार पारनेर/प्रतिनिधी : अहमदनगर पुणे महामार्गावर वांघुडे शिवारात पुण्याक...
नगर-पुणे महामार्गावर ट्रकने दोघांना चिरडले
वाघुंडे येथील अपघातात दोन ठार
पारनेर/प्रतिनिधी :
अहमदनगर पुणे महामार्गावर वांघुडे शिवारात पुण्याकडून नगरच्या दिशेने येत असलेल्या ट्रकने रस्ताच्या कडेला उभे आसलेल्या दोघांना चिरडले असुन यात दोघे जागीच ठार झाले आहेत.
याबाबत सुभाष अर्जुन रासकर वय ३४ धंदा शेती रा. वाघुंडे बुद्रुक ता. पारनेर यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्यादीत म्हटले आहे की, चुलते यशवंत रासकर वय ७० हे सुपा येथे जाण्यासाठी व त्यांच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती (वय ७०) असे नगर पुणे महामार्गावरील वाघुंडे फाटा
येथे रस्त्याच्या कडेला उभे असताना पुण्याकडून नगर कडे जाणारे ट्रक नंबर एन एल ०७, एन ९७८८ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक पुण्याकडून नगर कडे घेऊन जात असताना भरघाव वेगाने चालवून अपघातास कारणीभूत ठरला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दुपारी १.०० वाजन्याच्या दरम्यान अहमदनगर पुणे महामार्गावर पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने येत आसलेल्या ट्रकला वांघुडे गावच्या शिवारात एका मोटारसायकल वाल्याने
कट मारला असता ट्रक
चालकाने मोटार सायकलस्वराला वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यात मोटार सायकल स्वार बचावला. मात्र त्याच वेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोघांच्या अंगावर ट्रक गेल्याने या दोघांना ट्रकने चिरडले. यात दोघेही जागीच ठार झाले. आपघाताची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
तेथील परस्थितीचे पंचनामे करून मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले नंबर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटना घडल्यानंतर चालक घटना स्थळावरुन फरार झाला असुन सुपा पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आर. ए. शिंदे हे करत आहेत.