हरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल व क्रीडा साहित्य वाटप निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदा...
हरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल व क्रीडा साहित्य वाटप
निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेचा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार लंकेंच्या माध्यमातून प्रयत्नशील : सविता ढवळे
पारनेर/प्रतिनिधी :
कर्जुले हर्या येथे निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब शिर्के यांच्या विशेष प्रयत्नातून नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था व निलेश लंके महिला बालकल्याणकारी संस्था तसेच सोशल सेंटर अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व सहेली प्रोजेक्ट अंतर्गत कर्जुले हर्या येथील हरेश्वर विद्यालयांमध्ये आदिवासी समाजातील तसेच गरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरासरी तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस सायकल देण्यात आल्या तसेच शालेय साहित्य व क्रीडा साहित्य यावेळी वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप उपक्रमही यावेळी घेण्यात आला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हरेश्वर विद्यालयांमध्ये राबविण्यात आला. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा तसेच नवसंजीवनी संयुक्त महिला संस्थेच्या अध्यक्षा सविताताई ढवळे, अहमदनगर सोशल सेंटरचे फादर पेट्रिक, हरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव आंधळे, यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सविता ढवळे म्हणाल्या की सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम आमदार निलेश लंके करत आहेत यापुढील काळातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक योजना आम्ही राबवणार आहोत सर्वसामान्य विद्यार्थी गरीब घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी कर्जुले हर्या गणाच्या पंचायत समिती सदस्या सरुबाई वाघ, निलेश लंके प्रतिष्ठानचे कर्जुले हर्या शाखाप्रमुख सुनील मुळे, युवराज मुळे, विष्णू आंधळे गुरुजी, मा. तंटामुक्ती अध्यक्ष गंगाराम उंडे, हरिभाऊ उंडे, वसंतराव आंधळे, संग्राम उंडे, आदिनाथ वाफारे, सावकार आंधळे, बाबाजी स. वाफारे, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, दत्तात्रय आंधळे, योगेश उंडे, कासारे गावचे शंकर कासुटे, विष्णू दाते, दत्तात्रय वाफारे, रवींद्र वाफारे, भाऊसाहेब हुलावळे,
भाऊसाहेब दाते, बबन आंधळे, पांडुरंग आंधळे, अशोक गवळी, बाळासाहेब उंडे, शिवाजी वाफारे, पी. एस. उंडे साहेब, लहू धुळे, रामभाऊ उंडे, संतोष उंडे, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई आंधळे, झुंबरबाई आंधळे, वर्षा मुळे, अर्चना उंडे, सविता वाफारे, सुवर्णा उंडे, वंदना आंधळे, सुरेखा उंडे, शोभा वाघ, सीमा गायकवाड, निर्मला मुळे, वृषाली उंडे, छाया हुलावळे, सुरेश मुळे, फोटोग्राफर सुनील कोकाटे, ज्ञानदेव दातीर, हरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर बर्वे सर, तसेच यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कर्जुले हर्या येथील ग्रामस्थ, महिलावर्ग हरेश्वर विद्यालयातील शिक्षक रुंद आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून नव संजीवनी संयुक्त महिला संस्था व निलेश लंके महिला बालकल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व सोशल सेंटर अहमदनगर यांच्या माध्यमातून हरेश्वर विद्यालयातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जवळजवळ वीस सायकलचे वाटप तसेच शालेय साहित्य क्रीडा साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला होता तो पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांच्या साठी आमदार लंके यांनी दिलेले या साहित्याचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार लंकेंच्या माध्यमातून प्रयत्नशील : सविता ढवळे
यापुढील काळात काम करत असताना विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करून विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजना तसेच सामाजिक योजना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे आमदार लंके यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत नवसंजीवनी संयुक्त महिला संस्थेच्या अध्यक्षा तसेच निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा सविता ढवळे यांनी कर्जुले हर्या येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मत व्यक्त केले.