धूमस्टाईलने टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकातून गंठण लांबवले पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथील ...
धूमस्टाईलने टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकातून गंठण लांबवले
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण धूमस्टाईलने लांबवल्याची घटना घडली आहे. चोरटे पल्सर दुचाकीवरून आले होते. पाळत ठेऊन चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. भरदिवसा घटना घडल्याने टाकळी ढोकेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे.
पळसपूर येथील नीलम दत्त त्रय आहेर त्यांच्या गावाकडे जात असताना टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात काही वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर त्या चौकात उभ्या असताना टाकळी ढोकेश्वरकडून पल्सर दुचाकीवरून चोरटे आले. त्यांनी निलम यांच्या गळ्यातील गंठण बळजबरीने हिसका देऊन चोरून नेले. आरोपी पारनेरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलिस स्टेशनच्या टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून त्याआधारे तपास सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पॉलिश करण्याच्या बहाण्याने टाकळी ढोकेश्वर येथून | महिलेचे दागिने लांबविले होते. त्यानंतर ही घटना घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.