--> पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला : हभप. विकासानंद महाराज मिसाळ | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला : हभप. विकासानंद महाराज मिसाळ

पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला : हभप. विकासानंद महाराज मिसाळ टाकळी ढोकेश्वर येथे डीएनएस पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न पारनेर ...

पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला : हभप. विकासानंद महाराज मिसाळ

टाकळी ढोकेश्वर येथे डीएनएस पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न




पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) : 
टाकळी ढोकेश्वर येथील डीएनएस पतसंस्थेचे उद्घाटन समारंभ भागवतार्य  ह.भ.प.विकासानंद मिसाळ महाराज व जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी सर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बोलताना हभप. विकासानंद मिसाळ महाराज म्हणाले की "जोडोनिया धन उत्तम वेव्हारें, उदास विचारें वेच करी" म्हणजे चांगला प्रामाणिक धंदा करून पैसा मिळवावा व त्‍याचा विनियोग निवृत्त मार्गाने करावा, त्‍याचा सद्वय करावा. डीएनएस पतसंस्था नक्कीच भविष्यकाळात सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी काम करेल. टाकळी ढोकेश्वर सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी निश्चितच अर्थकारण मोठ्या प्रमाणावर होत असते. डीएनएस पतसंस्थेच्या माध्यमातून या प्रक्रियेला निश्चित गती मिळेल.


 डीएनएस पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळाने अनेक रोजगारभिमुख युवकांना या पुढील काळात सहकार्य करावे. पतसंस्थांमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. तसेच मिसाळ महाराज पुढे बोलताना म्हणाले की नगर जिल्ह्यातील पतसंस्था व मल्टीस्टेट यांचेमध्ये कामालीचा एकोपा आहे. चांगले काम करणारी व विचारवंत एकत्र आली आहेत. त्यातुन जिल्ह्याने सहकार चळवळीला बळ देत एका उंचीवर नेले आहे. बहुतांश क्षेत्रामध्ये कमी अधिक चुकीची माणसे असतात. त्यास सहकारी संस्था अपवाद नाहीत, असे असले तरी चांगले काम करणाऱ्या संस्था चालकांचे कौतुक करणे आपले कर्तव्य ठरते. त्यातुन चालकांना उभारी मिळून आणखी प्रगती होण्यास हातभार लागतो. टाकळी ढोकेश्वर सारख्या गावात पैशांची व विचारांची संस्कृती असल्याने येथे संस्था अधिक घौडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी टाकळी ढोकेश्वर येथे नव्याने सुरू झालेल्या डीएनएस पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


यावेळी राहुल शिंदे पाटील, बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, शिवाजी बेलकर, डीएनएस पतसंस्थेचे चेअरमन नारायण झावरे साहेब, व्हा.चेअरमन शिवाजी खिलारी, गुरूदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे, बाजार समितीचे मा. सभापती अरुण ठाणगे, माजी पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब लोंढे, ऍड. बाबासाहेब खिलारी, कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक पो. मा. झावरे, भगवान वाळुंज, उपसभापती विलासराव झावरे, अण्णा हजारे यांचे स्वीय सहाय्यक दत्ताभाऊ आवारी, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शेळके, जेष्ठ संचालक बाळासाहेब पाटील, संचालक कैलास नऱ्हे, उत्तमराव आग्रे, पूजा झावरे, उज्वला रोकडे, दीपक गुंजाळ, नवीन झावरे, संजय झावरे, निजाम शेख, खंडू भाईक, बापुसाहेब रांधवन, संस्थेचे मॅनेजर डी. आर. बांडे, आदी  तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी व सभासद आणि टाकळी ढोकेश्वर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वागत मोहनराव रोकडे यांनी केले तर सर्वांचे आभार किसनराव धुमाळ यांनी मानले.




COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला : हभप. विकासानंद महाराज मिसाळ
पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला : हभप. विकासानंद महाराज मिसाळ
https://lh3.googleusercontent.com/-QCX2IRYX4lc/YweP-AtCFQI/AAAAAAAAUcQ/_dTkKfQkGOk4TXRf77XJX3MnlZxr75VmgCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220825-WA0057.jpg
https://lh3.googleusercontent.com/-QCX2IRYX4lc/YweP-AtCFQI/AAAAAAAAUcQ/_dTkKfQkGOk4TXRf77XJX3MnlZxr75VmgCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220825-WA0057.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/08/blog-post_29.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/08/blog-post_29.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content