कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन सिताराम देठे पारनेर प्रतिनिधी : राज्यात सध्या कांद्याचे भाव पडल्याने ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन सिताराम देठे
पारनेर प्रतिनिधी :
राज्यात सध्या कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आलाय. यावरूनच आता भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पारनेर तालुका आत्म कमिटीचे सदस्य सिताराम देठे यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय. राज्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय निर्माण झालाय. 5 रुपयांपासून 8 रुपयांपर्यंत कांद्याचे भाव झालेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांचा कांदा बाजारात न नेता तसाच सडत पडून आहे काही ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करण्यासारखी पाऊल उचलत आहेत.
तरी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. दुसऱ्या राज्यांमधील सरकारने कांद्याला अनुदान घोषित केलंय, अनेक शेतकऱ्यांना कांद्याला योग्य तो भाव मिळाल्यास ते पुन्हा कर्जबाजारी होतील आणि त्यानंतर सावकाराच्या दारात जातील आणि मग त्यांच्या गळ्यात फास आवळला जाईल हे सरकारने लक्षात घ्यायला हवं. आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, सरकारने डोळेझाक करू नये, अशी मागणीही यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे यांनी केली आहे.
COMMENTS