रेनवडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिन रेनवडीत उत्साहात साजरा पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील रेनवडी...
रेनवडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिन रेनवडीत उत्साहात साजरा
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील रेनवडी येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्राचा अमृतमहोत्सवी वर्ष मोठ्या आनंदाने साजरे करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी रेनवडी गावचे सरपंच श्रीकांत डेरे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे महानगरपालिकेचे कॉन्ट्राटर व रेनवडी सोसायटीचे चेअरमन मुकेश डेरे तसेच जम्बो कोविड सेंटर मुंबई डीन डॉ. राजेश डेरे होते. त्याच बरोबर उपसरपंच बाबाजी येवले, ग्रामपंचायत सदस्य दत्ता येवले, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य भिवसेन येवले, व्हा चेअरमन बाबाजी येवले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय भोर, ग्रामपंचायत सदस्य सत्यभामा येवले, मा. चेअरमन भगवान डेरे, मा. सरपंच मोतीराम येवले, सोसायटी संचालक हनुमंत डेरे, सुभाष येवले, नानाभाऊ डेरे, गणपत गोसावी, शिवाजी शिंदे, अर्चना डेरे, शरद झिंजाड, तंटामुक्ती अध्यक्ष संपत डेरे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव भोर, प्रताप झिंजाड, राजेंद्र डेरे, बाबाजी भोर, बन्सी भोर, नवनाथ भोर, संदीप भोर, राजाराम येवले, बाळासाहेब येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील मुलांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. रेनवडी गावचे सोसायटीचे चेअरमन मुकेश डेरे यांनी शालेय साहित्य वाटप केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता येवले यांनी आपल्या भाषणात गावातील झालेली विकास कामांची माहिती दिली. येणाऱ्या काळात गावात कोणती विकास कामे होणार आहे. याचा पण आराखडा समजून सांगितला. सरपंच श्रीकांत डेरे यांनी गावासाठी अजून जेवढा विकास करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आज पर्यंत रेनवडी गावासाठी तब्बल २ कोटीचा निधी दिला आहे. आणि गावामध्ये २ कोटी ५० लक्ष रुपयाची कामे विविध विकास कामे चालू आहेत. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र डेरे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक मावळे सर यांनी केले.