किन्ही येथे ओंकारबाबांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न हजारो भाविकांची उपस्थिती पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळे) : ता...
किन्ही येथे ओंकारबाबांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
हजारो भाविकांची उपस्थिती
पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
तालुक्यातील किन्ही येथे सद्गुरु ओंकारबाबा यांनी सन १९७६ ला संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यास या वर्षी ४६ वर्ष पुर्ण झाले. असुन, दरवर्षी किन्ही येथील मुंबई , पुणे येथे असलेल्या सद्गुरु ओंकारबाबा शिष्य संप्रदाय मंडळ व ग्रामस्थांकडून दोन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीही ४६ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त भव्य आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी प्रवचन, किर्तन व अन्नदान करण्यात आले. तसेच रविवारी सकाळी संजीवन समाधीची पुजा , होमहवन करून सद्गुरु ओंकारबाबांच्या प्रतिमेची भव्य सुवाद्य मिरवणूक गावामधुन काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील महिला, पुरूष व युवकांचा मोठा सहभाग राहिला तसेच सद्गुरु ओंकारबाबा माध्यमिक विद्यालय व जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभागी होत.
ढोल , ताशांच्या निनादात लेझिम खेळत मिरवणुकीचि शोभा वाढवली. तद्नंतर आळंदी येथील ह. भ. प. आसाराम महाराज बडे यांचे काल्याचे किर्तन झाले. तसेच या दरम्यान गावातील विविध शासकीय सेवेतुन निवृत्त झालेल्या भुमिपुञांचा सन्मान करण्यात आला. तसेच दहावी व शिष्यवृत्तीच्या परिक्षेत विशेष प्राविण्यासह गुण प्राप्त करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सद्गुरु ओंकारबाबा शिष्य संप्रदाय मंडळ मुंबई व स्व. शामराव मुळे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कमेची बक्षिसे देण्यात आली. तसेच गावातील सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुपुञांचाहि सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सद्गुरु ओंकारबाबांचे नातू सुनिल अंबोदकर परिवारासह उपस्थित राहिले तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आदि जिल्ह्यातील ओंकारबाबांचा शिष्यगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओंकारबाबा संप्रदाय मंडळाच्या मुंबई, पुणे येथील सर्व सदस्यांनी व गावातील युवकांनी, ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.