वाडेगव्हाण शिवारात कंटेनरने महिलेला चिरडले नगर-पुणे महामार्गावरील अपघात थांबता थांबेना पारनेर/प्रतिनिधी : अहमदनगर- पुणे महामार्गावर अपघात म...
वाडेगव्हाण शिवारात कंटेनरने महिलेला चिरडले
नगर-पुणे महामार्गावरील अपघात थांबता थांबेना
पारनेर/प्रतिनिधी :
अहमदनगर- पुणे महामार्गावर अपघात मालिका चालुच असुन वाडेगव्हाण शिवारात कंटेनरने मोटरसायकलला मागुन धडक देत महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी दुपारी तीन चार वाजेच्या दरम्यान मोटारसायकल गाडीवर मुलगा आई व छोटी नात शिरुरकडून नगरच्या दिशेने येत असतांना वाडेगव्हाण ता. पारनेर शिवारात हॉटेल फाऊटन समोर कंटेनर क्रमांक एमएच 12 एचडी 5321 या कंटेनरने मोटारसायकला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील मुलगा व नात एका बाजुला पडले तर आई एका बाजुला पडल्या व त्यांना त्या कंटेनरने चिरडले. यात नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील 58 वर्षीय महिला या जागीच ठार झाल्याचे सुपा पोलीसांनी सांगितले.
घटनेची माहिती कळताच सुपा पोलीसांची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. व सदर मृतदेह रुग्णवाहीकेने पारनेर ग्रामीण रुग्णालयात उत्ताराय तपासणीसाठी नेण्यात आला. तर सदर घटनेतील कंटेनर चालक हा गाडी सोडून पळुन गेल्याचे सुपा पोलिसांनी यावेळी सांगितले.