निघोज परिसरातील खैराडी येथील मंळगंगा देवीचा यात्रा उत्सव संपन्न पारनेर/प्रतिनिधी : माता मळगंगा देवीचा जयजयकार करीत व भंडाऱ्याची उधळण करी...
निघोज परिसरातील खैराडी येथील मंळगंगा देवीचा यात्रा उत्सव संपन्न
पारनेर/प्रतिनिधी :
माता मळगंगा देवीचा जयजयकार करीत व भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांनी खैराडी परिसरातील मंळगंगा देवीचा यात्रा उत्सव श्रावणी तिसऱ्या मंगळवार निमित्ताने साजरा केला. यावेळी सकाळी नउ वाजता वाजत गाजत मंळगंगा देवीच्या पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. मंळगंगा देवीचा जयजयकाराच्या घोषनांनी परिसर निनादून गेला होता. गेली अनेक वर्षांपासून निघोज - पिंपरी जलसेन रस्त्यावर असणाऱ्या माजी सरपंच राजाराम कवाद यांच्या शेतीवाडी परिसरात खैराडी या ठिकाणी एक मंळगंगा देवीचे मंदिर बांधण्यात आले असून या ठिकाणी तिसऱ्या श्रावणी मंगळवार निमित्ताने यात्रा उत्सावाचे आयोजन करण्यात येत असते.
गावातून सकाळी या ठिकाणी मंळगंगा देवीची पालखी वाजत गाजत आणल्यानंतर देवीचा अभिषेक,पुजा व महाआरती करण्यात आली.त्यानंतर उपस्थित हजारो भावीकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुजा विधी व दर्शन घेतल्यानंतर पुन्हा ही मंळगंगा मातेची पालखी गावांमध्ये मिरवणुकीने आणली गेली.
यावेळी गावांतील महिला सुवासिनींने पालखीचे औंशन करीत पुजा करुन दर्शन घेतले. त्यानंतर मंळगंगा देवीच्या मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजन करण्यात आले होते.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत,कुलाबा मुंबईकर मंडळ व निघोज ग्रामस्थ यांनी आलेल्या हजारो भावीकांचे स्वागत करुण दर्शन व्यवस्था केली होती. खैराडी परिसरातील युवक मंडळाने भावीकांची दर्शन व्यवस्था व महाप्रसाद नियोजन व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती.
COMMENTS