पळशी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायतने केले विविध संकल्प पारनेर/प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत ...
पळशी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायतने केले विविध संकल्प
पारनेर/प्रतिनिधी :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त पारनेर तालुक्यातील पळशी ग्रामपंचायत समोर तिरंगा झेंडा सरपंच मंगलताई मधे यांच्या हस्ते फडकविण्यात आला. मलविर विद्या मंदिर पळशी शासकीय आश्रमशाळा पळशी, जि. प. प्राथ शाळा पळशी, जुनामळा येथील विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून पळशी येथील मेन चौकात झालेल्या छोटेखानी सभेत आपल्या वकृत्वातून उपस्थीत ग्रामस्थांची शाबासकी मिळविली.
यावेळी जि . प. शाळेची विद्यार्थिनीला रस्त्याच्या कडेला पडलेल्या विजेच्या तारेला चिकटली असताना आपल्या जिवाची पर्वा न करता तिला वाचविणाऱ्या तुकाराम केदार आणि भाऊसाहेब जाधव यांचा ग्रामपंचायत पळशी व शाळेच्या वतीने सन्मान करूण गौरवण्यात आले . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित खंडोबा माळ तसेच रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करूण मलविर विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दोन झाडे जोपासण्यासाठी देऊन ज्या विद्यार्थ्यांची झाडे चांगली जोपासली जातील अशा पहील्या पाच विद्याथ्यांना प्रत्येकी ११०० रु . रोख पारितोषीक देऊन वृक्षमित्र म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात येईल असे ग्रामपंचायत पळशीच्या वतीने जाहीर करण्यात आले.
तसेच सर्वच शाळेतील शिक्षकांना शाळेची गुणवत्ता वाढीसंदर्भात सुचनाही करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पळशीतील इ . १० वी तील जो विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवेल त्याच्या पालकांच्या हस्ते पुढील वर्षी ध्वजारोहण करण्यात येईल अशी माहीती उपसरपंच आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. यावेळी पळशी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पळशी सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी व पळशीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित राहील्याबद्दल सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामस्थांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.