"हर घर तिरंगा" बरोबर "हर घर संविधान ही द्या : राजेंद्र करंदीकर स्वातंत्र्याच्या सन्मानाबरोबर हक्काची ही जाणीव होऊ द्या. पारने...
"हर घर तिरंगा" बरोबर "हर घर संविधान ही द्या : राजेंद्र करंदीकर
स्वातंत्र्याच्या सन्मानाबरोबर हक्काची ही जाणीव होऊ द्या.
पारनेर प्रतिनिधी :
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना सर्वांचा ऊर अभिमानाने भरुण येतो. देशाविषयी प्रेमभाव आदरभाव वाढतो मात्र याच अमृत महोत्सवी वर्षात ' हर घर तिरंगा ' बरोबर हर घर संविधानही द्या, स्वातंत्र्याच्या सन्माना बरोबर हक्क आणि कर्तव्याची जाणीवही होऊ द्या असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र करंदीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.
स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाली तरी दलित आदिवासीचे प्रश्न सुटले नाहीत. कृषी प्रधान असलेल्या देशात शेतकरी उद्धवस्त होत चाललाय शेतात पिकविलेल्या मालाची किंमत शेतकऱ्याला ठराविण्याचा आधिकार नाही. रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्याच कष्टाच्या मालाची किंमत व्यापाऱ्यानी वातानुकीलत खोलीत करायची याचे सारखे दुर्दैव नाही.
वाढलेली महागाई खत बियाणे औषधे यांच्या आवाजवी किंमती यामुळे शेतीव्यवसाय तोटयात चालला आहे. याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल जातय ज्या शेतकऱ्याच्या अन्नावर देश जगतोय तोच सुखी समाधानी नसेल तर कशाचा आनंदात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करता या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उत्पादन खर्चावर आधारीत शेतीमालाच्या किमती ठरवून बळीराजाला बळ द्या नाहीतर ' पोटात भुक ... आणि डोळ्यात काजळ घालुन ' स्वातंत्र्य उत्सवाचा आनंद घेता येईल काय याचाही विचार होणे गरजेचे आहे .
गेले ८ वर्षापासुन महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आसताना सर्वसामान्य काही कुंटुबा ना दोन वेळेस अन्नाची चिंता आसताना हरघर तिरंगा फतवा आला आहो पण ज्या घरावर झेंडा लावायचा त्याला दांडा कुठुन आणायचा आणि झेंडा विकत घ्यायचा आणि जरी विकत घेतलाच तर त्याला स्वतःच्या मालकिचे घरच नाही. साडेतीन वर्षापुर्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी २०२२ साली भारतातील प्रत्येक कुंटुबाला स्वतःच्या मालकिचे पक्के घर देण्याची घोषणा केली मात्र १५ लाखाप्रमाणे ती पोकळच निघाली. त्यामुळे आता तरी हर घर तिरंगा बरोबरच हर घर संविधान द्या म्हणजे जनतेला हक्क आणि कर्तव्याची जाणिव होईल. असे मत करंदीकर यांनी व्यक्त केले.