वेब टीम : मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे...
वेब टीम : मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यात अनिता बिर्जे यांना शिवसेना उपनेतेपद मिळाले. केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून ओवळा, माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी हे त्यांचे कार्यक्षेत्र असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
तसेच प्रदीप शिंदे यांना ठाणे शहरप्रमुखपद तर चिंतामणी कारखानीस यांना ठाण्याचे विभागीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ठाणे जिल्हाप्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्याची खेळी शिवसेनेने खेळली अशी चर्चा उठली होती. पण अशी कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे सांगत या चर्चा केदार दिघे यांनी फेटाळल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.
भाजपवर व शिंदे गटावर सातत्याने टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांना आता लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घडामोडी होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला मोठा धक्का देत धर्मवीर आनंद दिघेंचे (Anand Dighe) पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना पक्षातील मोठी जबाबदारी दिली.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर शिंदे गट शिवसेनेशी बंडखोरी करत आहे, असे बंडखोर नेत्यांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे . त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी पदाचा राजीनामा दिला.
या राजीनाम्यानंतर, आज ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली. ही उद्धव ठाकरेंची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS