मुंबई : बँकेच्या शाखांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषांमध्ये बोलावे. ग्राहकांना विशिष्ट भाषेमध्ये बोलण्याचा आग्रह करू नये अशी ...
मुंबई :
बँकेच्या शाखांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषांमध्ये बोलावे. ग्राहकांना विशिष्ट भाषेमध्ये बोलण्याचा आग्रह करू नये अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. भारतीय बँक संघटनेच्या 75 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काल त्या मुंबईत बोलत होत्या. बँका या देशात व्यवहार करण्यासाठी आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषेत बोलता आले पाहिजे. ज्यांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना बँकेच्या शाखेमध्ये ग्राहकांशी संबंध येणार नाही अशी कामं देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
स्थानिक गरजा आणि भाषांचा विचार करून भरती प्रक्रिया राबवावी असंही सीतारामन यावेळी म्हणाल्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेही यावेळी उपस्थित होते. दरम्यान लघु उद्योग भारती 'प्रदेश अधिवेशन 2022' या परिषदेचं उद्धघाटनही काल मुंबईत निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असून जागतिक स्तरावर 10 वर्षात भारत 11 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आला आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या. कोरोनाचं संकट, रशिया - युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीची मर्यादा अशा कठीण परिस्थितीतून आपली वेगाने वाढ झाली आहे.शेतीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा प्रभाव असला तरी कौशल्यावर लक्ष केंद्रित करून डिजिटल जगाला आत्मसात करायला हवं अशी अपेक्षा सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे देखील या परिषदेला उपस्थित होते.तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या परिषदेत सहभागी होत आपले विचार मांडले. पुढच्या दोन वर्षात गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू असं फडणवीस यावेळी म्हणाले... मगाशी मी उल्लेख केला 14 ते 19 चा या काळात आपण उद्योगस्नेही अशा अनेक त्याठिकाणी योजना आणल्या अनेक निर्णय केले तर त्याचा परिणाम काय आहे तर साधारण 2013 मध्ये आपण बघितलत तर महाराष्ट्रात जी काय परकीय गुंतवणूक येत होती.त्याच्यात आपण पाचव्या क्रमांकावर होतो.14 ,15 मध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो 15 साली आणि 15 नंतर ते 19 पर्यंत प्रत्येक वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर गेलो. आपण पहिल्या क्रमांकावर तर गेलोच पण आपल्या मागे जी राज्य होती म्हणजे दिल्ली, गुजरात , कर्नाटक , तामिळनाडू या सगळ्यांची मिळून बेरीज तेरा मिलीयान डॉलर होती. आणि एकट्या महाराष्ट्राची 20 बिलियन डॉलर होती आणि हे सहा वरून सहवीस पर्यंत वर गेली होती.
सातत्याने पहिल्या क्रमांकावर आपण होतो दुर्दैवाने आपला क्रमांक गेल्या दोन वर्षात घसरला पण मी एक गोष्ट त्यांना ही सांगतो सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे तुमाच्या काळात महाराष्ट्र गुजरात च्या मागे गेला असेल पुढच्या दोन वर्षात महाराष्टाला गुजरात च्या पुढे नेलं नाही तर बघा निश्चित नेणार आणि ही हेल्दी स्पर्धा आहे गुजरात आणि पाकिस्ताची थोडी आहे आमचा लहान भाऊ आहे , एकत्र होते पण शेवटी हेल्दी स्पर्धा आहे आम्हाला गुजरात च्या पुढे जायचंय आम्हाला कर्नाटक च्या पुढे जायचंय आम्हाला सगळ्यांच्या पुढे जायचंय महाराष्ट्र नंबर वन चं राहिला पाहिजे आणि तो नंबर 2 होऊ शकत नाही आणि ते आम्ही करून दाखवू .