'एक दिवस बळीराजासाठी' या अभियानातंर्गत राज्याचे कृषी आयुक्त बहिरोबावाडीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करणा...
'एक दिवस बळीराजासाठी' या अभियानातंर्गत राज्याचे कृषी आयुक्त बहिरोबावाडीत
शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करणार - धिरजकुमार
पारनेर/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने १ सप्टेंबर पासुन राज्यात 'माझा एक दिवस बळीराजासाठी' हे अभियान राबविले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार यांनी पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी या गावाची निवड करून बुधवारी सायंकाळी ते गावात दाखल झाले यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक कृषी संचालक रफिक नाईकवाडी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी श्री. जगताप, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड आदि उपस्थित होते.
बुधवारी सायंकाळी राज्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार यांनी बहिरोबावाडी येथे व गुरूवारी सकाळी किन्ही येथे ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन घेतले यादरम्यान शेतकऱ्यांनी दैनंदिन जिवनात भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या बहुतांश शेतकऱ्यांनी शेत, पानंद रस्त्यांसाठी भरिव निधीची तरतुद करावी असे सांगितले तसेच शेतीसाठी दिवसा विजपुरवठा मिळावा तसेच वन्य प्राण्यांपासून दिवसेंदिवस शेतीची नासधुस वाढु लागली आहे व शेतकऱ्यांच्या व पाळीव पशुंच्या जिवीतास धोके निर्माण होऊ लागले असल्याने वन विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली तसेच शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी दुधाला ऊसाच्या धर्तीवर एफ.आर.पी.चे दरसंरक्षण मिळावे यासाठी कायदा करण्याचे सुचवले तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमिभाव मिळावा तसेच रासायनिक खते कंपन्यांकडून अन्य निविष्ठा घेण्याची सक्ती केली जाते ते बंद करावे तसेच पाझर तलावांच्या पाणी साठवणक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पाझर तलावांमधील गाळ काढण्यासाठी व उंची वाढविण्यासाठी शासन स्तरावर भरिव निधीची तरतुद व्हावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या वेळी कृषी आयुक्त धिरजकुमार यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणुन घेत उपस्थिताना मार्गदर्शन केले
धिरजकुमार बोलताना म्हणाले की, माझा एक दिवस बळीराजासाठी या अभियानातंर्गत राज्याच्या कृषी मंञ्यांपासुन ते गावपातळीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण १ सप्टेंबर पासुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी एका गावाची निवड करून तेथे मुक्कामी राहतील व शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतील या सर्व समस्या जाणुन घेत राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारे प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करून अंमलात आणणार आहे. त्यामुळे मला देखील आज शेतकऱ्यांमध्ये आल्यानंतर विविध प्रश्न समजलेले आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रशासन म्हणुन सदैव शेतकऱ्यांसोबत राहणार आहोत. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देखील किन्ही , बहिरोबावाडी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना लवकरात लवकर या गावात शासकीय शिबीर घेऊन शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले.
या वेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील, सरपंच पुष्पा खोडदे, उपसरपंच हरेराम खोडदे, चेअरमन ञ्यंबकराव मुळे, प्रा. सचिन मोढवे सर , बाबासाहेब व्यवहारे, सिताराम देठे, दिलीप खोडदे, बबन देठे, शिवाजी देठे, बाळु शिंदे, व्हा. चेअरमन शंकर व्यवहारे, यशवंत व्यवहारे, संजय व्यवहारे, बापु व्यवहारे, आदिनाथ व्यवहारे, शरद व्यवहारे, कृषी विभागाचे अधिकारी श्री कापसे, साठे, श्रीमती भुजबळ, कृषी सहाय्यक माधुरी बोऱ्हुडे आदि उपस्थित होते.