स्वातंत्र्य चळवळीत उमाजी राजे नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान : बाळासाहेब रेपाळे पुणेवाडी येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी पारनेर/प्रति...
स्वातंत्र्य चळवळीत उमाजी राजे नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान : बाळासाहेब रेपाळे
पुणेवाडी येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील पुणेवाडी येथे आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची २३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुणेवाडी ग्रामपंचायत व जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सरपंच रेपाळे म्हणाले की आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे समाज हितासाठी मोठे कार्य आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी झोकून देऊन जुलमी इंग्रज सत्तेशाहीशी लढा दिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १८५७ च्या उठावाच्या दरम्यान उमाजी राजे नाईक यांनी विविध ठिकाणी उठाव केले. त्यामुळे त्या काळामध्ये इंग्रज सत्तेला आव्हान निर्माण झाले होते. सर्व सामान्य घटकातील लोकांसाठी ही त्या काळामध्ये राजे उमाजी नाईक यांनी मोठे कार्य केले त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. अशा या महान महापुरुषाचा आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे.
यावेळी प्रमुख उपस्थिती पुणेवाडी सरपंच बाळासाहेब रेपाळे, माजी सरपंच आनंदा बोरुडे, जय मल्हार क्रांती संघटना पारनेर तालुका सचिव अक्षय गाडेकर, बाबाजी पोटे, बाबाजी बोरुडे, पिनू पोटे, संजय भंडारकर, दत्तू गाडेकर, संतोष गाडेकर, प्रवीण गाडेकर, प्रशांत गाडेकर, दत्ता भांडारकर, ग्रामसेवक संजय मते, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणेवाडी येथील ग्रामस्थ ही यावेळी उपस्थित होते.
COMMENTS