चांदा ( प्रतिनिधी ): नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रमाचे मठाधिपती ह.भ. प. रोहिदास महाराज चांदेकर यांचे मंगळवारी पहाटे दोन...
चांदा ( प्रतिनिधी ): नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रमाचे मठाधिपती ह.भ. प. रोहिदास महाराज चांदेकर यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांनी महाराजांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांचे वय ७४ होते .
महाराजांच्या निधनाचे वृत्त जसजशे राज्यात पोहोचले तशी भाविकांनी महाराजांच्या अंत्य दर्शनासाठी गर्दी केली होती.
वै. रोहिदास महाराज यांचे अहमदनगर जिल्ह्यात नाही तर राज्याच्या अनेक भागात भक्त गण आहेत..
सजवलेल्या रथातून महाराजांची टाळ मृदंगाच्या गजरात अंतयात्रा श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणाहून निघाली. शनि चौक, बाजारपेठेतून स्वाॅ मील चौक मार्गे श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणी आणण्यात आली.
तिथेच त्यांच्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक महाराज मंडळी व उपस्थित असलेल्या राजकीय मंडळींनी महाराजांना श्रध्दांजली वाहिली. महाराजांच्या निधनाने दुपारी तीन वाजेपर्यंत गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
COMMENTS