वेब टीम: मुंबई तुरुंगातले हे दिवस आपण कधीही विसरणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. आपण चाळीस...
वेब टीम: मुंबई
तुरुंगातले हे दिवस आपण कधीही विसरणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. आपण चाळीस वर्ष पत्रकारिता करत आहोत. यासोबतच 30 वर्ष सामना सारख्या मोठ्या वृत्तपत्राचे आपण संपादक राहिला आहोत.
4 वेळा खासदार म्हणून राज्यसभेवर गेले आहोत. अशा व्यक्तीला अटक केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणेकडून आपल्याला अटक करण्यात आली. मात्र आपण कायदेशीर लढाई जिंकलो असल्याचा पत्रकाराची संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या भांडुप येथील घरी आले. घरी येत असताना त्यांनी शिवसैनिकांसी संवाद साधला. मला अटक करून किती मोठी चूक केली आहे हे आता त्यांना कळेल असाही इशारा दिला आहे.
मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. १०० दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलंत मी तुमचा आभारी आहे. १०० दिवसांनी मी घरी आलो आहे. माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त भांडुप किंवा मुंबईत नाही तर महाराष्ट्रातल्या शिवसैनकांमध्ये आनंद झाला आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने आणि देशानं पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही तुम्ही जमला होतात. तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.