वेब टीम अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारणी नियुक्तीसाठी शनिवारी (दि. 3 डिसेंबर) मुलाखतीचे आयोजन करण्या...
वेब टीम अहमदनगर
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारणी नियुक्तीसाठी शनिवारी (दि. 3 डिसेंबर) मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय वलय नसलेल्या व सामाजिक कार्याची आवड असलेल्या शहरातील सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांना मुलाखतीद्वारे शहर युवकच्या विविध पदावर नियुक्ती करुन त्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित युवकांना संधी देण्यासाठी व त्यांना पक्षाला जोडून घेण्याच्या उद्देशाने शहर युवकच्या कार्यकारणीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता नवलेनगर, गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात मुलाखती होणार असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले आहे.