अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने अठराव्या आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी नि...
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने अठराव्या आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे सोमवार दि.19 डिसेंबर पासून या मैदानी स्पर्धेचा थरार रंगणार असून, 14 व 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता 14 व 16 मुले व मुलींच्या वयोगटात स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूमधून फक्त उत्कृष्ट 13 खेळाडू खेळाडूंची पटणा (बिहार) येथे होत असलेल्या अठराव्या आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची 80 मीटर धावणे, 600, 1600 मीटर धावणे, 80 मीटर हार्डल्स, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, उंच उडीची स्पर्धा होणार आहे. तर 14 वर्षे वयोगटातील ट्रायथॉलन अ गट मध्ये 60 मीटर स्टँडिंग ब्रॉड जम्प (शॉर्ट पूट), ब गटात 60 मीटर स्टँडिंग ब्रॉड जम्प (हाय जम्प), क गटात स्टँडिंग ब्रॉड जम्प (600 मीटर) स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे दिनेश भालेराव यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9923837888 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.