--> कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत

अहमदनगर ::: कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिन...

अहमदनगर ::: कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. १ लाख ४४ हजार ९०० रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत. 
          मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, कोतवाली पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल मिळून आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते मूड तक्रारदार यांना दीड लाख रुपये किंमतीचे मोबाईल परत देण्यात आले आहेत. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोना/1381 सलीम शेख, पोकॉ/759 राजेंद्र फसले व दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/ प्रशांत राठोड यांनी पार पाडली.
..............................
मोबाईल यांना मिळाले परत
रंगनाथ दिवटे (रा.आगरकर मळा), विठ्ठल कृष्णराव जोशी (रा.आनंदी बाजार), प्रवीण विठ्ठल भालेकर (रा.केडगाव), जयश्री पुरोहित (रा.नविपेठ), सलमान आरिफ खान (रा.बेपारी मोहल्ला), गौरव आखाडे (रा.माळीवाडा), जालिंदर नवनाथ पुलावळे (रा.केडगाव), सारिका अडागळे (रा.कोठी), सोनाली साठे (रा.माळीवाडा), अशोक घेवरे (रा.स्टेशन रोड), सुनील कांबळे (रा.बुरुडगाव), प्रफुल्ल जाधव (रा.भिंगार)

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत
कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhx85LYDn65kNhrxuGYeZnDkkiHhlDmmh2-9Y1yVWKtaZSOXPC1m43Bz-uOmIzVWE68wZgjNsMEN-gi-iKxhxk7hXKyLiNLlfPZUDgPU1Ib821MYUy9LAKXDVwXiGy0Ll11wWJx6XTzxGVsDkHaZh8fCMgwT1kmvnhYEyGi3z_fOCqcmjjs7ufOgUhb
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhx85LYDn65kNhrxuGYeZnDkkiHhlDmmh2-9Y1yVWKtaZSOXPC1m43Bz-uOmIzVWE68wZgjNsMEN-gi-iKxhxk7hXKyLiNLlfPZUDgPU1Ib821MYUy9LAKXDVwXiGy0Ll11wWJx6XTzxGVsDkHaZh8fCMgwT1kmvnhYEyGi3z_fOCqcmjjs7ufOgUhb=s72-c
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2023/05/blog-post_16.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2023/05/blog-post_16.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content