नगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी एकनाथ ढाकणे यांची तर व्हा.चेअरमनपदी गोरक्षनाथ शेळके यांची बिनविरोध ...
नगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी एकनाथ ढाकणे यांची तर व्हा.चेअरमनपदी गोरक्षनाथ शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.के.मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चेअरमनपदासाठी एकनाथ ढाकणे व व्हा.चेअरमनपदासाठी गोरक्षनाथ शेळके यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या रिक्त झालेल्या मानद सचिवपदी शामराव भोसले यांची संचालक मंडळाने एकमताने निवड केली.
या बैठकीस संचालक तथा मावळते चेअरमन बाळासाहेब आंबरे, मावळते व्हा.चेअरमन रामदास गोरे, संचालक मंगेश पुंड, सुनिल नागरे, रुबाब पटेल, किसन भिंगारदे, सतिष मोटे, उध्दव जाधोर, दिलीप नागरगोजे, संदीप लगड, सुनिल वाघ, बबनराव सांगळे, वाळू मुंढे, भगवान खेडकर, सविता भाकरे, राणी वाघ-फाटके, लक्ष्मण नांगरे, मधुकर जाधव, नवनाथ गोळे, संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहाय्यक नफीसखान पठाण, सभासद बाळासाहेब कडू पा.,सागर खळेकर, अशोक नरसाळे, राजेंद्र पावसे, युवराज पाटील, मधुकर दहिफळे आदींसह सभासद, ग्रामसेवक संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन चेअरमन एकनाथ ढाकणे म्हणाले की, संस्थेत तब्बल 28 वर्षांपासून मानद सचिव पदावर कार्यरत आहे. सर्व संचालक, सभासदांच्या आग्रहास्तव प्रथमच संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळत आहे. ग्रामसेवकांसाठी ही पतसंस्था कामधेनू आहे. त्यांचे जीवनमान उंचाविण्यात संस्थेने नेहमीच योगदान दिले आहे. यंदा लाभांश व ठेवीवरील व्याजापोटी एक कोटी 29 लाख रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. सभासदांना चोवीस तासांत 30 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सभासदांचा 25 लाखांचा अपघात विमा उतरविण्यात आला आहे. मयत सभासदाचे सर्व कर्ज माफ केले जाते. संस्थेची स्वमालकीची तीन मजली सुसज्ज इमारत आहे. संगणकीकृत व्यवहार, दिवाळीला प्रत्येक सभासदाला पंधरा किलो साखर मोफत वितरित केली जाते. उत्कृष्ट कामकाजाची हीच परंपरा सर्वांना सोबत घेऊन पुढेही कायम राखण्याचा प्रयत्न राहिल.
व्हा.चेअरमन गोरक्षनाथ शेळके म्हणाले की, ग्रामसेवकांचे एकमुखी नेतृत्व एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठित पतसंस्थेच्या व्हा.चेअरमनपदाची संधी मिळणे हे खूप आनंददायी आहे. पतसंस्थेला सर्वोत्तम आणि सभासद हिताच्या कारभाराची मोठी परंपरा आहे. सर्व संचालकांच्या सहकार्याने उत्कृष्ट कामकाज करून संस्थेला आणखी प्रगतीपथावर नेण्याची ग्वाही त्यांनी दिली.