नगर (प्रतिनिधी)- परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून व...
नगर (प्रतिनिधी)- परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून विटंबने विरोधात आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाज बांधवांवर प्रशासनाने केलेल्या अन्यायग्रस्त कारवाई विरोधात व दडपशाही संदर्भात जिल्हाधिकारी यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, अमित काळे, योगेश थोरात, डी.आर.जाधव, सागर ठोकळ, नितीन कसबेकर, विशाल भिंगारदिवे, गौतमीताई भिंगारदिवे, सुरेशराव भिंगारदिवे, वैभव जाधव, नवीन भिंगारदिवे, प्रकाश कांबळे, जीवन कांबळे, सिद्धांत कांबळे, गौतम वाघमारे, अनंत लोखंडे, सदाशिव भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, पंकज लोखंडे, सचिन जमदाडे, विजय जाधव, अमोल काळे, आदित्य भिंगारदिवे, येशुदास वाघमारे, सतीश साळवे, पप्पू पाटील, संदीप वाकचौरे, विजय शिरसाठ, लखन सरोदे, हिराबाई भिंगारदिवे, रंजना भिंगारदिवे, राधा पाटोळे, विशाल गायकवाड, सारंग पाटेकर, प्रशांत कदम, सचिन जमदाडे, सागर पोळ, विनोद भिंगारदिवे, रोहन शिंदे, शांतवन साळवे ,अजित धारविसावे, विद्या शिंदे , प्रा जाधव एल बी ,सिद्धार्थ पवार, सिद्धांत गायकवाड, अक्षय बोरुडे , विलास साठे सर , राम ठुब , दया गजभिये , शनेश्र्वर पवार , विशाल कांबळे , योगेश त्रिभुवन , पिट्या उबळे , सिद्धार्थ भिंगारदिवे, सिद्धार्थ राजगुरु, सचिन शेलार, महेंद्र वाघचौरे, दादू मगर आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच कलम १७६(१अ) सी आर पी सी अन्वे या प्रकरणाची चौकशी करावी व न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत न करता न्यायाधीशामार्फत करण्यात यावे व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम ३२ अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही तातडीने जप्त करून त्यांचे फुटेज तपासावेत व सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने ५० लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी व सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करावे व श्रीमती वसल्ल्याबाई मानवते या महिलेस मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कलम ३५४/३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायधीशांच्या देखरेखित मेडिकल करावे व पोलिसांनी केलेल्या कोंबिंग कारवाईत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घराची नुकसान भरपाई द्यावी जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करून घ्यावेत तसेच संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी समस्त आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.