जगज्जेत्या सिकंदरचा मृत्यू नेमका कसा झाला?


DNALive24:
सिकंदर बादशाहने जगावर राज्य करण्याचे ठरविले होते. त्याच्या काळात एकही राजा प्रतिस्पर्धी नव्हता जो सिकंदराला लढाईत हरवू शकेल. अशा या जगज्जेत्या सिकंदराचा मृत्यू नेमका कसा झाला हे एक प्रकारचे कोडेच आहे.

जगज्जेता सिकंदर महानच्या मृत्यूभोवती गेली 2,300 वर्षे एक गूढ वलय बनले आहे. सिकंदरचा मृत्यू जंतुसंसर्ग किंवा अतिमद्यपानाने झाला असावा किंवा त्याची हत्या झाली असावी असा काहींचा दावा आहे. न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठाच्या डॉ. कॅथरिन हॉल यांनी मात्र असा दावा केला आहे की, सिकंदरचा मृत्यू ‘जीबीएस’ नावाच्या मज्जातंतूच्या विकारामुळे झाला. या विकारात शरीराची प्रतिकारशक्ती स्वत:च्याच मेंदू व पाठीच्या कण्यादरम्यानच्या मज्जातंतूवर हल्ला चढवते.

अवघ्या 32 वर्षांच्या सिकंदरला या विकारामुळे ताप चढला, पोटात भयंकर वेदना सुरू झाल्या व नंतर पक्षाघाताचा झटका आला. मृत्यूसमयी सिकंदर बेश्ाुद्धावस्थेत असावा असेही ‘एन्शंट हिस्टरी बुलेटिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात डॉ. हॉल नमूद करतात. यावरून आपल्याला लक्षात येते की सिकंदर याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post