DNALive24 : Sport ३० मेपासून सुरु झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा पहिलाच सामना होता. या पहिल्याच सामन्यात कमकुवत वाटणाऱ्या वेस्ट...
DNALive24 : Sport
३० मेपासून सुरु झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा पहिलाच सामना होता. या पहिल्याच सामन्यात कमकुवत वाटणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानला चीतपट केले. स्पर्धेच्या या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला.
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची पुरती धूळधाण उडाली. पाकिस्ताननं दिलेलं १०५ धावांचं कमकुवत लक्ष्य वेस्ट इंडिजने १४ व्या षटकातच गाठलं. वेस्ट इंडिजचा तडाखेबाद फलंदाज ख्रिस गेलनं ३४ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या जोरावर खणखणीत अर्धशतक ठोकलं, तर निकोलस पूरन याने नाबाद ३४ धावांची खेळी साकारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
शुक्रवारी ट्रेंटब्रिजच्या नॉटिंघम स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेला पाकिस्तान संघ केवळ 105 धावांवर ऑलआउट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाने 13.4 ओव्हरमध्ये 108 धावा काढून सामना जिंकला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने 3 विकेट घेतल्या. आता येत्या बुधवारी भारताचा सामना दक्षिण आफ्रीकेसोबत होणार आहे.