सुजय विखेंचे अभिनंदन ; आम्ही हिशोबाला रेडी - आ. जगताप


अहमदनगर 
देशातील मोदी लाट आणि धनशक्तीचा वापर यामुळेच अहमदनगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचा विजय झाला आहे. काम न करणार्‍यांचा आणि विरोधकांचा आगामी तीन महिन्यांत हिशोब करु म्हणणार्‍यांच्या हिशोबाला आम्ही तयार आहोत असे प्रत्युत्तर आ. संग्राम जगताप यांनी नूतन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पत्रकार परिषदेत दिले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अवघ्या 22 दिवसांमध्ये निवडणुकीच्या स्पर्धेत आणणार्‍या महाआघाडीचे नेते, कार्यकर्ते व मतदारांचे त्यांनी आाभार मानले.

कालपासूनच विधानसभेची तयारी सुरू केल्याचे जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत आम्ही प्रचार केला. त्या तुलनेत मला मिळालेली मते महत्वाची आहेत. त्याबद्दल मतदार आणि दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे आभार. आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. डॉ. विखे यांचा विजय मोदींचा चेहरा आणि धनशक्तीमुळे मिळालेला आहे. विधानसभेसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहोत, मात्र पक्षांतर करण्याचा कोणताही विचार आपल्या मनात नाही.’


डॉ. सुजय विखेंचे अभिनंदन- आ. संग्राम जगताप
नगर दक्षिण मतदारसंघाध्ये जनतेने दिलेला कौल मान्य आहे. पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. निवडणूक काळात दिलेली आश्‍वासने त्यांनी पूर्ण करावीत. तसेच भावी वाटचालीस नूतन खासदार सुजय विखे पाटील यांना सदिच्छा दिल्या. दरम्यान, कालपासूनच विधानसभेची तयारी सुरु केली असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post