पाथर्डीत 'पॅडमॅन' स्टाईलने विवाह; लग्नात वाटले सॅनिटरी नॅपकिन


DNALive24 : अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. अभिनेता अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटात दाखविल्याप्रमाणे समाजात सॅनिटरी नॅपकिनबाबत जनजागृती करून नवविवाहित दाम्पत्याने लग्नसोहळ्यातच सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करत आदर्श निर्माण केला.

युवा चेतना फाऊंडेशनच्या माध्यमातून अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चि. भारत दत्तात्रय गडदे व चि. सौ. का. प्रतिक्षा दिनकर पाताळे हे नवविवाहित दाम्पत्य 500 सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून खऱ्या अर्थाने पॅडमॅन ठरले आहे.

पाथर्डी तालुक्यातील काळेवाडी या गावात एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. कोणतही  लग्न म्हणलं की अवाढव्य खर्च , महागड्या भेट वस्तू या सर्व गोष्टी यावर लाखो रुपयांची उधळण होते; मात्र या विवाह सोहळ्यात  एक वेगळाच आदर्श चि. भारत दत्तात्रय गडदे व चि. सौ. का. प्रतिक्षा दिनकर पाताळे या नवविवाहित दाम्पत्याने समाजापुढे ठेवला आहे.

या लग्न सोहळयापासून युवा चेतना फाउंडेशन अंतर्गत ऊसतोडणी कामगार महिलांना एक लाख सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरवात म्हणून चि.भारत गडदे यांच्या विवाह प्रसंगी 500 महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले आहे. तसेच गावातील महिलांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाली आरोग्याची जनजागृती करण्यात आली.

अशा प्रकारची कल्पना राबवणार हा विवाह सोहळा भारतातील एक अनोखा विवाह सोहळा ठरला आहे. कारण बऱ्याच आरोग्यविषयक गोष्टीवर लोकांना बोलायची सुध्दा लाज वाटते अशा विषयावर काम करून भारत व प्रतिक्षा या दाम्पत्याने स्वतः च्या लग्नात 500 महिलांना सॅनिटरी पॅड चे वाटप करून जनजागृती केली. भारत हा धनगर कुटुंबातील आणि उच्च शिक्षित तरुण आहे. स्वतःच्या समाजासाठी व ऊसतोडणी महिलांसाठी सॅनिटरी पॅड चे वाटप करून खऱ्या अर्थाने पॅडमॅन ठरला आहे.

या विवाहास शुभाशीर्वाद देण्यासाठी सुधीर लंके, डॉ. आरती शर्मा,  गिरीश कुलकर्णी, श्याम असावा, अमर कळमकर, योगेश काकडे, योगेश शिवाजीराव काकडे, प्रा. राणी तोरडमल, अशोक चिंदे, परम काकडे, राहुल झिरपे, ज्ञानेश्वर आघाव आदींनी या दाम्पत्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post