सुप्रिया सुळेंच्या गळ्यात विरोधीपक्षनेतेपदाची माळ?


DNALive24 : नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांनी सपाटुन मार खाल्ल्यानंतर आता लोकसभेत विरोधीपक्षनेतेपद कुणाच्या ताब्यात द्यायचे? याबाबत खलबते सुरु झाली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत लोकसभेचे विरोधीपक्षनेतेपद सुप्रिया सुळेंना देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत या भेटीत चर्चा होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी हा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे.

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. असं झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते. त्यामुळे या भेटीचे तपशील बाहेर आल्यावरच नक्की काय चर्चा झाली हे समजू शकेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post