सुजय विखे की प्रीतम मुंडे : मंत्रिपदावर कुणाची लागणार वर्णी?


DNALive24 : नवी दिल्ली
दुसऱ्यांदा मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या मोदी सरकारचा शपथविधी आज होणार आहे. मोदींच्या या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातून नगरचे खा. सुजय विखे व बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना या मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता असून, सुजय विखे की प्रीतम मुंडे या दोघांपैकी कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे.

सुजय विखे हे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव आहेत. तर प्रीतम मुंडे या माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या तर ना. पंकजा मुंडे यांच्या भगिनी आहेत. सुजय विखे निवडून आल्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण हेही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नरेंद्र मोदी हे आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

२०१४ साली मोदी अवघे ८ टक्के तरुण खासदार निवडून आले होते. यंदा मात्र तरुण खासदारांची संख्या १९ टक्के झाली आहे. गेल्या वेळेस कुठलाही अनुभव नसलेल्या राजवर्धनसिंह राठोड यांना मोदींनी संधी दिली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून सुजय विखे अथवा प्रीतम मुंडे यांना कॅबिनेट मंत्री अथवा राज्य मंत्री पदावर संधी मिळू शकते.

विखे यांना मंत्रिपद देऊन महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अहमदनगरसह नाशिक, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला बळ देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिल्यास मराठवाड्यात भाजपाला फायदा होणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी कुणाची वर्णी मंत्रिपदावर लागणार याची उत्सुकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post