शेततलावात बुडून सख्या तीन चुलत भावांचा मृत्यू


वेब टीम, पारनेर
ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

 या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की,  उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले  होते. आज हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते.  परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व  गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले.  या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post