एटीएम मशीनच पळविले ; १७ लाख रुपयांची रोकड लांबवली


वेब टीम : संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बँक आँफ महाराष्ट्र गुंजाळवाडी शाखेसमोरील  एटीएम मशीनच चोरटयांनी उचलून नेले आहे. या मशीनमध्ये 17 लाख 18 हजार रुपयांची रोकड होती. ही घटना शनिवारी (दि.23) पहाटेच्या सुमारास
घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक रस्त्यावरील प्रसाद कॅफेसमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या गुंजाळवाडी शाखेशेजारी एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी मिनी एटीएम मशीन असलेल्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन वेगळे केले व चक्क उचलून नेले.
काही अंतरावर गेल्यावर एटीएम मशीनची तोडफोड करत १७ लाख १८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. आज सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक पंकज निकम यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates