हद्दपारी टळली ; उपनेते अनिल राठोड यांना दिलासा


वेब टीम, अहमदनगर
शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेला हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांनी फेटाळला. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आधी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. केडगाव हत्याकांडानंतर दगडफेक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी राठोड यांच्या विरोधात नगर परिसर व जिल्ह्यातून दोन वर्षचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

हा प्रस्तावावर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सुनावणी सुरू होती.. दरम्यान चांगल्या वर्तनूकीची हमी, दोन वर्षेसाठीचे बंधपत्र, दोन प्रतिष्ठित व्यक्तीच्या जामीनपत्रावर राठोड यांची सुटका करण्यात आली.

या प्रकरनी उपविभागीय दंडाधिकारी 25 रोजी निकाल दिला होता. मात्र राठोड यांना कोतवाली पोलीसानी शनिवारी नोटीस दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post