मनपातील खरे भ्रष्टाचारी अभियंतेच, अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशीसाठी सेना आक्रमक


वेब टीम : अहमदनगर

महापालिकेत राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने अभियंत्यामार्फत खोटे नाटे आरोप करुन शिवसेनेला बदनाम करण्याचे काम चालू असून मनपातील खरे भ्रष्टाचारी हे अभियंतेच आहेत. महापालिकेतील अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करावी यासाठी लोकायुक्त यांच्याकडे जाणार आहे. अभियंत्यांचे दहशतीचे विधान म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. मनपा भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राठोड म्हणाले, महापालिकेतील अधिकार्‍यांची काही महत्वाचे कागदपत्रे गोळा करत आहे. ती मिळाल्यानंतर अधिकार्‍यांच्या संपत्तीचे खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी लोकायुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा अधिकार्‍याला बूट फेक प्रकरणात अधिकार्‍यांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे अशी मागणी कोर्टात करणार असल्याचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले. अधिकार्‍यांची माहिती मागविली असल्याने त्यांना घोटाळा बाहेर येण्याची चिंता वाटू लागली आहे. तसेच घोटाळा बाहेर आल्यास मनपातील चार अधिकारी जेलमध्ये जातील असेही त्यांनी सांगितले.

अनेक ठेकेदारांचे बोगस कामे असून बोगस बिले काढली जात आहेत. याची माहिती मागितली असून कामांची फेरतपासणी झाल्यास अनेकांचे पितड उघडे पडणार असल्याचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे मनपाच्या अनेकांना जेल वारी करावी लागती आहे. आता अधिकारीच सेनेच्या नावाने बोंबा मारत आहेत. अभियंत्यांचे म्हणणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत असे उपनेते राठोड यांच्यासह फुलसौंदर म्हणाले.

अभियंता कल्याण बल्लाळची बदली कोणी केली. कशी केली हे सर्वांना माहित आहे. अधिकार्‍यांकडे पैसा येतो कुठून असा सवाल करत अधिकार्‍यांचा भ्रष्टाचाराचा लेखाजोखा लोकायुक्तांकडे देणार असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले. यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post