वेब न्यूज : मुंबई राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थो...
वेब न्यूज : मुंबई
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी सकाळी ही घोषणा करण्यात आली. बाळासाहेब थोरात हे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राधाकृष्ण विखे यांनीही सुरुवातीला विरोधी पक्ष नेतेपदाचा व नंतर पक्षासह आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसकडून विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांना संधी मिळेल अशी शक्यता होती. कॉंग्रेसकडून अखेर त्यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदासह अन्य पदांसाठीची नावेही जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभेच्या नेतेपदी विजय वडेट्टीवार आणि उपनेतेपदी नसीम खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बसवराज मुरुमकर यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय, के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांच्याकडेही विधानसभेच्या प्रतोदपदाची धुरा सोपवण्यात आलेय. तर विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे आणि उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, भाई जगताप हे विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद असतील.
COMMENTS