पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन २५०’


वेब टीम, कोलकाता

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे उत्साहित झालेला भारतीय जनता पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२१ ला विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.

भाजपचे लक्ष्य आता ही विधानसभा निवडणूक जिंकणे आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप दोन स्तरावर काम करत आहे. तृणमूल काँग्रेसचा जनाधार असलेले नेते भाजपमध्ये सामील करून घेणे आणि ग्राउंड पातळीवर संघटनेला मजबूत करणे या दोन प्रमुख रणनीतीवर भाजप काम करत आहे.

मिशन २५०

विधानसभेच्या २९४ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने ‘मिशन २५०’ लक्ष्य ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसला २२ जागा मिळाल्या आहेत. भाजपला तृणमूल काँग्रेस पेक्षा ४ जागा जास्त मिळाल्या असल्या तरी भाजपने बंगालमध्ये १८ जागा जिंकत ममतांच्या गडाला हादरा दिला आहे.

एका बाजूला तृणमूल काँग्रेस स्वतःला बंगालच्या अस्मितेशी जोडत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप स्वतःला बंगाली समाजाच्या हिताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय भाजपने या ठिकाणी नौकऱ्यांची निर्मिती, नागरी संशोधन विधेयक आणणे आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे देखील पक्षाला फायदा होऊ शकतो. हे मुद्दे राष्ट्रवाद, ओळख आणि दैनंदिन गरज या विषयाशी संबंधित आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post