राज्यात २८८ जागांवर भाजपाची लढण्याची तयारी : मुख्यमंत्री


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीला अवघे ३ महिने बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनी एकत्र निवडणुकीत यश मिळवले होते.  आता भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत राज्यात सर्व २८८ विधानसभा जागांवर लढण्याची तयारी ठेवा अशी सूचना कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 देवेंद्र फडणवीस यांनी “युती होईल, पण त्यात मुख्यमंत्री कोणाचा हे समजूतदार माणसाला कळते. अनुभवी, बालिश लोकांना त्याची चर्चा करू द्या, जिंकण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन यांनी करत युती झाली, तरी मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहील”, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज्यात शिवसेनेशी युती होईल, पण कोणाला कोणत्या जागा सुटतील, हे ठरलेले नाही. तुम्ही मात्र, सर्व २८८ जागा लढण्याची तयारी ठेवा”, असेही सूचित केले.  मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, या चर्चेत तुम्ही पडू नका, ते आम्ही बघू, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेला ७०-८० टक्के मते युतीला मिळाली, तेथील पक्षाच्या आमदारांनी गाफील न राहता परिश्रम घ्यावेत, असेही फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates