चंद्रकांत पाटील पुण्याचे तर गिरीश महाजन जळगावचे पालकमंत्री


वेब टीम, मुंबई
पुण्याच्या पालकमंत्री पदावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची तर जळगावच्या पालकमंत्री पदावर ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील 11 किंवा 12 जूनला भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार व राधाकृष्ण विखे यांच्यात वितुष्ट आले होते. त्यामुळे विखे यांची पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

मात्र ती शक्यता बाजूला सारत पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांची दिल्लीत भेट होत आहे. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा, तसेच रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनीही दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मुख्यमंत्री याबाबत चर्चा करुन संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत आणि नंतर दिल्लीतही यासंदर्भातल्या बैठका होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post