कोठडीचे गज कापून पळलेले आरोपी अखेर गजाआड


वेब टीम : संगमनेर
येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सराईत चोरट्यांनी कोठडीचे गज कापून तेथे गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसाला चकमा देऊन सिनेस्टाईल पळले होते. परंतु काही वेळातच संगमनेर शहर पोलिसांना  दोघांना पकडण्यात यश आले.
विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा. मंचर, जि. पुणे) कलीम अकबर पठाण (वय 20, रा. संगमनेर) ही पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर पोलीस ठाणे आवारातील न्यायालयीन कोठडीत असलेले विशाल तांदळे व कलीम पठाण यांनी आज पहाटेच्या सुमारास कोठडीचे गज कापले. तेथून दोघेही बाहेर पळून जाऊ लागले. परंतु, गार्ड ड्यूटी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही त्यांना धक्का देऊन खाली पाडले व तेथून धूम ठोकली.
कोठडीतून दोन आरोपी आल्याची बातमी पसरताच संगमनेर शहर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली व आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या अकोले नाका येथे दोघेही पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 353, 332, 224, 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर येथील कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न गेलेल्यांपैकी विशाल तांदळे हा यापूर्वी पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील पोलिसांच्या कोठडीतून खिडकीचे गज कापून पळून गेला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post