विजेचा शॉक बसून पोलिसाच्या मुलीचा मृत्यू


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाची मुलगी कु. पूजा सुनील कुऱ्हे ही MBA शिकत असलेल्या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

हवालदार सुनील कु-हे हे आपल्या कुटुबासह पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहत आहेत. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे त्यांच्या घरावरील पत्रे व भिंतींत वीजप्रवाह उतरला होता. दरम्यान आज दुपारी पूजा घरात असताना तिला विजेचा झटका बसला. कुटुंबियांनी तातडीने तिला रुग्णालयात हलविले. मात्र तिचा तत्त्पुर्वीच मृत्यू झाला. पूजा एमबीएचे शिक्षण घेत होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates