'ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या'


वेब टीम : अहमदनगर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व 48 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देऊन निवडणुका लढवल्या आहे. परंतु झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेल्या मतदार त्यामध्ये अनेक ठिकाणी तफावत आढळून येत आहेत. या मतमोजणीच्या फरकाबाबत निवडणूक आयोगाने समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भारिप बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभे करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत विविध ठिकाणी आता मतमोजणी करताना अडचणी आल्या आहेत. अनेक ठिकाणे आकडेवारी जुळलेली नाही वारंवार मागणी करूनही निवडणूक आयोगाने अद्यापही कोणत्याही प्रकारची माहिती जनतेला दिलेली नाही यावरून निवडणुकीत ईव्हीएम चा गैरवापर झाला असा आमचा संशय आहे. यासाठी इव्हीएम नको तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना या मागणीचे निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, दिलीप साळवे, सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज, योगेश थोरात तसेच आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates