सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही- एकनाथ खडसेंचा विखेंना टोला


मुंबई

विरोधी पक्षात असताना कॉंग्रेसकडून अनेकदा ऑफर आल्या होत्या, मात्र सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही, असे म्हणत माजी महसूलमंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.


भोसरी भूखंड प्रकरणात आरोप झाल्यावर एकनाथ खडसे यांना मंत्रीपद सोडावे लागले होते, काही महिन्यांपूर्वी या प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर खडसेंचा मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा होती, मात्र आजच्या विस्तारातही त्यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह नाही, म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आपला पक्ष सत्तेत आहे याचे समाधान आहे, मंत्रिमंडळात समावेश झाला नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. विरोधी पक्षात असताना कॉंग्रेसकडून अनेकदा ऑफर आल्या, परंतु सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही. सत्ता आली की सत्तेचे गुण अवगुण पक्षाला लागणारचं, अशी नाराजीही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post