मोदींनी घेतले बालाजीचे दर्शन


वेब टीम, तिरुपती
पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच विदेश दौ-यावर गेलेले नरेंद्र मोदी यांनी दौ-यावरून परतल्यानंतर आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घतेले. नरेंद्र मोदींनी त्यांनी व्यंकटेश्वराची विधीवत पूजा केली. यावेळी आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी उपस्थित होते.

विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिरुपती बालाजीचे चित्र भेटस्वरुपात देले होते. यानंतर आज श्रीलंका दौ-यानंतर भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाजीचे दर्शन घेतले.

तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी एका सभेला संबोधीत केले. त्यावेळी त्यांनी चंद्राबाबू नायडू यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. काही जण अद्याप निवडणुकांच्या निकालांच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत, अशी टीका मोदी यांनी केली. विधानसभेत नायडू यांना केवळ २३ जागा मिळाल्या तर वायएसआर काँग्रेसला १५१ जागा मिळाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post