सत्तेचा माज करू नका, नाहीतर जनता धडा शिकवते : मोहन भागवत


वेब न्यूज : नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी नागपूरात झाला. संघाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तृतीय संघ शिक्षा वर्गाला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सरसंघचालक काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आणि सल्लाही दिला. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. सत्तेचा माज केला की काय होतं हे बंगालच्या जनतेने दाखवून दिलं असं सांगत त्यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला.
सरसंघचालक म्हणाले, लोक हे अतिशय शहाणे आहेत. त्यांना कोण काय करतं हे कळतं. जे सत्तेचा माज करतात त्यांना लोक नाकारतात हे पश्चिम बंगालमध्ये दिसून आलं. ते पुढे म्हणाले, राजकीय पक्षांना निवडणूका लढवाव्या लागतात पण स्पर्धा असल्यामुळे वातवरणही ढवळून निघत. निवडणुकीनंतर सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे.
यावेळेस पुन्हा सत्तेत आलेल्या पक्षाकडून लोकांना काही अपेक्षा होत्या काही पुर्ण झाल्या काही व्हायच्या आहेत. पुन्हा सत्तेत आलेल्या पक्षाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या पुर्ण कराव्या लागतील. स्वार्थ आणि भेदभाव सोडून यावेळेस देशातील मतदारांनी मतदान केलं. निवडणूक प्रचारात काही पक्षांनी ढकोसला मतदारांपुढे सादर केला होते पण तो मतदारांनी नाकारला. निवडणुकीचा शिमगा संपला तरी कवित्व संपले नाही असं ते म्हणाले.
पश्चिम बंगाल सरकारवरही त्यांनी टीका केली. पश्चिम बंगाल मध्ये काय सुरु आहे असे कुठे झाले आहे काय? अशा परिस्थितीत शासन प्रशासनाने कारवाई करावी केली पाहिजे. सत्तेचा उपभोग करून लोकशाहीची थट्टा केली, सत्तेचा माज दाखवला तर सामान्य जनता अशा नेत्यांना धडा शिकवते असंही त्यांनी सांगितलं.

कसा असतो संघ शिक्षा वर्ग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग २३ जूनला रेशीमबागमधील स्मृती भवन परिसरात सुरू झाला होता. या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. पहाटे साडेचार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत स्वयंसेवकांचा दिनक्रम ठरलेला असतो. सकाळ व संध्याकाळ शारीरिक कार्यक्रमात खेळ, दंड, समता, नियुद्ध तर दुपारी गटचर्चा, संवाद, बौद्धिक कार्यक्रम होतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post