राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीमार्फत चौकशी


DNALive24 : वेब न्यूज, मुंबई
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) ही चौकशी होईल.

याबाबत अधिकृत नोटीस देखील प्रफुल पटेल यांना देण्यात आली. हवाई क्षेत्रातील दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

या प्रकारावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना ईडीने नोटीस बजावली असून, ते नोटिशीचे समाधान करू शकतील असा विश्वास व्यक्त केला. सामान्यांना विमानात बसण्याची सुविधा मिळाली ती प्रफुल पटेल यांच्यामुळेच त्यामुळे सूडाचे राजकारण कोणी करू नये’, अशी अपेक्षापाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, प्रफुल पटेल यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावर प्रफुल पटेल म्हणाले की, ईडीला चौकशीत सहकार्य करण्यास तयार असून हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post