घटनेनुसार विखे, क्षीरसागर मंत्री होऊ शकत नाही : पृथ्वीराज चव्हाण


 वेब टीम : मुंबई
भाजपमध्ये सुरु असलेल्या नेत्यांच्या इकमिंगवरुन काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने आमचे जे नेते पळवले आहेत हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.
काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर भाजपने दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदही दिलं. या मंत्रिपदांविरोधात काँग्रेस नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
राज्यघटनेनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाऊन मंत्री होऊ शकत नाही. त्यांना मिळालेलं मंत्रीपद पक्षांतर व्याख्येचं उल्लंघन आहे, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 साली त्यांनी केलेल्या घटनादुरुस्तीनुसार एखाद्या आमदार किंवा खासदाराने आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन पक्षांतर केले, तर मंत्री होण्यासाठी त्याला पुन्हा निवडणूक लढवून आमदार किंवा खासदार होणं बंधनकारक असणार आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
या निकषांनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबतची सध्याची परिस्थिती घटनाविरोधी आहे. त्यांनी पक्षांतर केलं नसून, मुख्यमंत्र्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या दोघांनाही त्वरीत मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates