राहुरीत बेदम मारहाणीत बिअरबार व्यवस्थापकाचा मृत्यू


वेेेब टीम : राहुरी
रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बिअरबार येथे व्यवस्थापकाला टोळकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यवस्थापकावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राहुरी पोलिसांनी सदर गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे.

नरेद्र सदानंद शेटे हे मयत व्यवस्थापकाचे  नाव आहे. याप्रकरणी दिपक भिमराज नवले (वय ३३), लक्ष्मण आण्णासाहेब म्हसे (वय ३३), अशोक वसंत म्हसे (तिघे रा. कोदवड, राहुरी), भीमराज श्रीधर बोरकर (वय ३८, रा. केंदळ, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post