नगर शहरात पावसामुळे मोठे नुकसान


वेब टीम, अहमदनगर
दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे नगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने जिल्हा पोलिस मुख्यालयातील जुन्या झी मराठीवर असलेले पत्रे उडून गेले आहे. शहरातील काही भागात मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.
अचानक आलेल्या पावसाने शहरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली आहे. रस्त्यावर शेतमाल विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या यामुळे नुकसान झाले आहे महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाई योग्य रीतीने न केल्याने गटारांमधील पाणी रस्त्यावर आले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post