वेब न्यूज : दिल्ली आरबीआयकडून तिमाही धोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट...
वेब न्यूज : दिल्ली
आरबीआयकडून तिमाही धोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट 6.0 टक्क्यांवरून आता 5.75 टक्क्यांवर आलाय. त्यामुळे आता कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.
COMMENTS