सावेडी कचरा डेपो आगीत 28 लाखांचा धूर ; गुन्हा दाखल


वेब टीम, अहमदनगर

सावेडी येथील कचरा डेपो व 28 लाख रुपय किंमतीचे खत प्रकल्प यंत्र पेटविल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित राजाराम कुरणे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.3) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कचरा डेपोला आग लागली होती.

दरम्यान कचरा डेपोला आग लावणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी खत प्रकल्प चालविणाऱ्या व्यवस्थापनाने पोलिस प्रशासनाकडे केली होती. अखेर काल शुक्रवारी (दि.8) गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेने वडगाव गुप्ता रोड वर महानगरपालिका हद्दीत नवीन कचरा डेपो सुरू करण्यात आला होता. नगर शहरासह उपनगरातील सर्व कचरा तिथे संकलित केला जातो. सदर कचरा डेपोस तेथील स्थानिक रहिवाशांचा व काही राजकीय पुढाऱ्यांचा विरोध असून सदर कचरा डेपो येथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प महानगरपालिकेने उभारलेला असून त्याचे कॉन्ट्रॅक्ट पुणे येथील पीएच जाधव यांच्या कंपनीला देण्यात आलेला होता. कुरणे हे कचरा डेपो प्रकल्पात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रोमल कन्व्हेअर बेल्ट गिअर मोटारी ऑटो फिडर अशी यांत्रिक उपकरणेच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रकिया करण्याचे काम केले जात होते. सोमवारी सदरच्या कचरा डेपो हा इतर ठिकाणी हलवावा या कारणाकरिता अज्ञात इसमाने ज्वलनशील पदार्थ टाकत कचरा डेपो व खत प्रकल्पास आग लावलेली. या आगीत पीएच जाधव यांच्या कंपनीचे 28 लाख रुपये किमतीचे प्रकल्पाचे यांत्रिक उपकरण जळून खाक झालेले असून पीएच जाधव कंपनीचे 28 लाख रुपये किमतीचे नुकसान झालेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिरसाट हे करत आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post