काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; सीआरपीएफचे पाच जवान शहीद


वेब टीम : अनंतनाग

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात के. पी. रोडवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले आहेत तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील निरीक्षकाचाही समावेश आहे.

सीआरपीएफ जवानांच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी अचानक लक्ष्य केले. अत्याधुनिक रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करतानाच दहशतवाद्यांनी ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना उपचारांदरम्यान वीरमरण आलं असून अन्य जखमींना उपचारांसाठी श्रीनगर येथे हलवण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post