महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख किसन गोयल निलंबित ; कामात दिरंगाई केल्याचा ठपका


वेब टीम : अहमदनगर
कामात कुचराई केल्या प्रकरणी महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख किसन गोयल यांच्यावर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सोमवारी (दि.२४) दुपारी निलंबनाची कारवाई केली आहे.

राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण २० टक्के असल्याने यात लक्षणीय वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने येणार्‍या ३ वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने उद्दिष्ट्य ठरवून दिलेले आहे. नगर महापालिकेसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्ट्यानुसार वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्याची जबाबदारी उद्यान विभाग प्रमुख किसन गोयल यांच्यावर सोपविण्यात आली होती. परंतु त्यांनी या कामात कुचराई केल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी गोयल यांना निलंबित केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates